संडे स्पेशल : 'थोरात-राजळे' पॅटर्न देईल शेवगावच्या विकासाला गती
संडे स्पेशल : 'थोरात-राजळे' पॅटर्न देईल शेवगावच्या विकासाला गती -ऍड. उमेश अनपट आ जतागायत अनुभवलेल्या शेवगावच्या विकासाची दयनीय परिस्थिती पाहता अक्षरशः किंवा येते. त्या तुलनेत आपल्या आजूबाजूचे इतर तालुके आणि तेथील नेतृत्वाने साधलेला विकास पाहिल्यावर शेवगाव किती मागे राहिले हे स्पष्टपणे अधोरेखित होते. याला जबाबदार कोण ? याबाबत जास्त चर्चा करण्यास वेळ घालण्यात काहीही हासील नाही. त्याचा फिशोब जनतेला मतदानातून करूदेत. त्यापेक्षा येथून पुढे शहराच्या विकासाची वाट कोणत्या मार्गाने नेता येईल, याची चाचपणी आता शेवगावकरांनी केलेली बरी. मागील आतापर्यंतचा अनुभव पाहता यावेळी कस लावून वेगळा आणि सक्षम पर्याय निवडण्याची नितांत आवश्यकता आहे. तर आणि तरच शेवगावला विकासाचे दिवस दिसतील. अन्यथा पाचवीला पुजलेली साठमारी काही केल्या हटायची नाही. असे झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार शेवगावकरच असतील, हे वेगळे सांगायला नको. बदलाची संधी नेहमी नेहमी मिळत नसते आणि ती मिळाली तर सोडायची नसते. या निवडणुकीत ती संधी तुमच्या हातात आहे. 'अभी नही, तो कभी नही', अशी