त्या शिक्षकांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी 

बुलढाणा : सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्या चिखली तालुक्यातील पांढरदेव येथील मराठी पूर्व माध्यमिक ( प्रायमरी) शाळेच्या शिक्षका विरुद्ध गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कार्यालय चिखली यांचेकडे तक्रार अर्जाच्या माध्यमातून 'त्या' शिक्षकाला सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पांढरदेव येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक हे व्हाट्सअप ग्रुप तसेच फेसबुक च्या माध्यमातून 73 50 494090 या मोबाईल नंबर वरुन राजकीय पक्षाचा प्रचार करीत असल्याचा आरोप चिखली येथील प्रशांत डोंगरदिवे यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन केला आहे.

प्रशांत डोंगरदिवे यांनी तक्रार अर्जात नमूद केले की, कोरोना महामारी सुरू होण्याच्या अगोदर शाळा सुरू असताना सदर शिक्षक महोदय हे सोशल मीडियात सक्रिय राहत होते तसेच शिक्षकी पेशाचा फुकटचा पगार घेऊन शासनाची दिशाभूल करून शासनाचे आर्थिक नुकसान करीत असल्याचे नमूद केले.

शालेय सेवा शर्ती नियमांचा भंग करण्याचा कोणताही नैतिक व कायदेशीर अधिकार कोणाला नसतो. त्यामुळे सदर शिक्षकाच्या फेसबुक व व्हाट्सऍप अकाउंट ची कायदेशीर पडताळणी करून सदर शिक्षकाला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी प्रशांत डोंगरदिवे यांनी केली. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

तपासणीचा पोलिसांना नाही अधिकार