केकाण साहेब ! मुख्याधिकाऱयांच्या कार्यकाळात काय काय दडलंय ?

केकाण साहेब ! मुख्याधिकाऱयांच्या कार्यकाळात काय काय दडलंय ? नगरपरिषद झाल्यापासून गेल्या पाचवर्षात प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी गरकळ हे नगरपरिषदेचा कारभार पहात आहेत. त्यांच्या काळात एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी रहात असेल तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे, तसेच एव्हढ्या दिवसात त्यांनी शहरात नेमके काय काम केले, असा सवालही उपस्थित होत आहे. या पाच वर्षाच्या कार्यकाळात जर मुख्याधिकाऱयांकडून शेवगावच्या हिताच्या दृष्टीने कामे होत नसतील तर त्यांना या पदावर कायम न ठेवता त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी का जोर धरू लागली. मुख्याधिकारी गरकळ साहेबांच्या कार्यकाळात किती निधी आला आणि तो कुठे आणि नेमका कसा खर्च झालाय हे तपासल्यानंतरच याचे कोडे उलगडेल आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कारभारात 'नेमकं काय काय दडलंय', हे देखील समोर येईल, अशी अपेक्षा शेवगावकरांना आहे. शेवगाव शहराला नगरपरिषद झाली आणि शहरवासीयांना विकासाचे स्वप्न पडले. आता शेवगावचा विकास नक्कीच होईल, अशी त्यांची भावना झाली होती.मात्र प...