Posts

Showing posts from January, 2021

तलाठी

‘ऊंटावरुन शेळ्या हाकणे’ हा प्रकार सर्वांनाच परिचित आहे. गावागावातले तलाठी तालुक्याच्या ठिकाणी  खासगी माणसामार्फत ग्रामस्थांची कामं करतात. हा प्रकार निदर्शनास आल्यानं राज्याच्या महसूल विभागानं खास आदेश पारित केलाय. ग्रामस्थांच्या कामांसाठी यापुढे खासगी व्यक्ती अर्थात ‘झिरो तलाठी’ नेमल्यास संबंधित तलाठ्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तलाठ्यांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागत असल्यास त्यादिवसाच्या दौर्‍याची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिसेल या दृृृष्टीनं तलाठी कार्यालयातल्या सूचना फलकावर ती लिहावी. या माहितीसोबत स्वत:च्या मोबाईल क्रमांकासह सर्कल, मंडलाधिकारी आणि नायब तहसिलदारांचा मोबाईल क्रमांक द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या आदेशाने ‘झिरो तलाठी’ ठेवणार्‍या तलाठ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे तलाठ्यांना ‘ऊंटावरुन शेळ्या हाकता येणार नाहीत. कारण या ‘झिरो तलाठ्या’बद्दल ग्रामस्थांच्या प्रचंड प्रमाणात गंभीर तक्रारी आहेत. ग्रामस्थांच्या किरकोळ कामांसाठी हा ‘झिरो तलाठी’ अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करतो. पैसे न देणार्‍याला तलाठ्याविषयी चुकीची माहिती सां...